मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनप्रमाणेच मुंबईतील
सर्व रेल्वे टर्मिनसवर प्री-पेड टॅक्सीसेवा सुरु होणार
मुंबई, दि. 9 : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनप्रमाणेच मुंबईतील सर्व रेल्वे टर्मिनसवर प्री-पेड टॅक्सीसेवा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच ही सेवा दादर, बांद्रा टर्मिनस, कुर्ला टर्मिनस व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे टप्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशावरुन ही सेवा सुरु होत आहे.
मुंबईतील लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेचा लाभ असंख्य प्रवाशांना होत असतो. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पुढील स्थानिक प्रवासासाठी टॅक्सीची गरज असते. सद्या रेल्वे टर्मिनसबाहेरील टॅक्सी स्टँडवर टॅक्सी मिळवावी लागते. यामध्ये अनेक अडचणी येतात. हे टाळून मुंबईतील विमानतळावर उपलब्ध असणाऱ्या प्री-पेड टॅक्सी सेवेप्रमाणे मुंबईतील रेल्वे टर्मिनसवर ही सेवा टप्याटप्प्याने सुरु करण्याचा आदेश श्री. चव्हाण यांनी दिला आहे.
या सेवेतील पहिला टप्पा म्हणून मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकावर प्री-पेड टॅक्सी सुरु झाली आहे. त्यानंतर दादर, बांद्रा टर्मिनस, कुर्ला टर्मिनस व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पुढील महिनाभरात प्री-पेड टॅक्सी सेवा सुरु करण्याची सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन विभागाला केली आहे.
----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा