श्री. पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
(महाराष्ट्राचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून दि. 11 नोव्हेंबर 2010 रोजी शपथविधी)
जन्म तारीख | 17 मार्च 1946 |
जन्म ठिकाण | इंदूर (मध्यप्रदेश) |
शिक्षण | बी.ई.(ऑनर्स), एम्.एस्. (बीआयटीएस) पिलानी, राजस्थान आणि युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (युएसए). |
ज्ञात भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी, |
कौटुंबिक माहिती | · वडील - स्व.दाजीसाहेब उर्फ आनंदराव चव्हाण, 11 वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात. पं. जवाहरलाल नेहरुंचे सहकारी · आई - स्व.प्रेमलाकाकी चव्हाण, माजी खासदार. |
वैवाहिक माहिती | विवाहित, पत्नी श्रीमती सत्वशीला. |
अपत्ये | दोन (एक मुलगा, एक मुलगी) |
व्यवसाय | अभियंता, तंत्रज्ञ. |
विशेष आवड | भारतीय भाषांच्या संगणकीकरणाविषयी संशोधन |
मतदार संघ | कराड, जि.सातारा. 1991, 1996 आणि 1998 मध्ये लोकसभा सदस्य म्हणून निवड. राज्यसभा सदस्य म्हणून 2002 व 2008 अशी दोन वेळा निवड. सद्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य. |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1973 पासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य. |
इतर माहिती | · 1991 ते 1996 : सदस्य, लोकसभा. सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समिती. · 1992-93 : सदस्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वन समिती. · 1994-95 : सदस्य, वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती. · 1995-96 : सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती, सदस्य, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती. · 1996-97 : सदस्य, 11व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद, लोकसभा काँग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, वित्त मंत्रालयाची सल्लागार समिती. · 1996-98 : काँग्रेस संसदीय पक्षाचे सचिव, · 1998-2000 : सदस्य, सार्वजनिक लेखा समिती · 2000-2001 : प्रवक्ता, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. · एप्रिल 2002 : राज्यसभेवर निवड. · एप्रिल 2008 : राज्यसभेवर फेरनिवड, राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन. · 2004-2009 व मे 2009 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र कार्यभार), भू-विज्ञान, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन खात्यांचे राज्यमंत्री. · महाराष्ट्राचे 26 वे मुख्यमंत्री म्हणून दि. 11 नोव्हेंबर 2010 रोजी शपथविधी. · दि. 28 एप्रिल 2011 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर बिनविरोध निवड. दि. 30 एप्रिल 2011 रोजी विधानपरिषदेचे सदस्य म्हणून शपथ. · राज्यसभा सदस्यत्वाचा दि. 6 मे 2011 रोजी राजीनामा. |
छंद | क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुध्दिबळ, गोल्फ आणि वाचन. |
परदेश प्रवास | अमेरिका, फ्रान्स, जपान, युके, पाकिस्तान, बांगलादेश, तैवान, जर्मनी, श्रीलंका, नेपाळ, ओमान, चीन, इंडोनेशिया, इटली, मलेशिया, नेदरलँड, पनामा, पोर्तुगाल, सिंगापूर, स्वित्झरलंड, थायलंड या देशांना विविध परिषदांच्या निमित्त भेटी. |
पत्ता : | कार्यालय : मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, 6 वा मजला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई 400 032. दूरध्वनी क्र. : 022-22025151, 22025222, फॅक्स : 022-22029214 निवास : "वर्षा", मलबार हिल, भाऊसाहेब हिरे मार्ग, मुंबई-400 006 दूरध्वनी : 022 - 23634950, 23633051 फॅक्स : 022 - 23631446 |
कायमचा पत्ता | पाटण कॉलनी, शनिवार पेठ, कराड, जि.सातारा. 415410. |
---------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.