मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा शोकसंदेश

बोलकी छायाचित्रे टिपणारा
छायाचित्रकार हरपला - मुख्यमंत्री

मुंबई, दि.13 सप्टेंबर : ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांची छायाचित्रे बोलकी असत. त्यांच्या निधनाने छायाचित्रण क्षेत्रातील एक जाणकार व्यक्तिमत्व हरपले आहे,  अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात- गौतम राजाध्यक्ष यांच्याकडे छायाचित्रण कलेसाठी आवश्यक असलेली प्रतिभा होती. त्यामुळेच त्यांनी काढलेली छायाचित्रे बोलत असत. चित्रपटसृष्टीतील कित्येक नामवंतांची अप्रतिम छायाचित्रे त्यांनी टिपली. गायन, क्रीडा, जाहिरात आदी क्षेत्रातील नामवंतांची त्यांनी काढलेली कित्येक छायाचित्रे अजरामर ठरली आहेत.  त्यांनी खऱ्या अर्थाने फोटोग्राफीला ग्लॅमर मिळवून दिले.  पोर्ट्रेट ही त्यांची खासियत होती. व्यक्तिचे गुण त्यांच्या छायाचित्रात उतरले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आणि प्रयत्न असायचा. ते उत्तम लेखक आणि समीक्षकही होते.  त्यांचे ' चेहरे ' हे पुस्तक त्यांच्या अनुभवांवर आधारित स्वतंत्र मराठी कॉफी टेबल पुस्तक म्हणून प्रसिध्द आहे.  विविध प्रकारच्या संगीताची त्यांना आवड होती आणि त्यांच्याकडे संगीताचा मोठा संग्रह होता.
                                        -----0-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा