गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन ‘सुशासन दिन’
महाराष्ट्रात सुशासन आणण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि:१८ माजी पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस “ सुशासन दिन” म्हणून पाळण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्त गेल्या ४५ दिवसांत घेतलेल्या निर्णयाची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांना दिली आहे.             

हे निर्णय पुढीलप्रमाणे:-

·        २०१५ हे वर्ष “ डिजिटल” पद्धतीने राज्यातील नागरिकांना कालबद्ध सेवा देणारे वर्ष म्हणून घोषित
·        नागरिकांना ‘सेवेची हमी देणारा कायदा’ अंमलात आणणे सुरु  
-    या प्रस्तावित कायद्यान्वये नागरिकांना कालबद्ध  सेवा मिळणार
-    हा कायदा सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था यांना लागू. कर्तव्यात कसूर केल्यास दंड. तसेच चांगल्या सेवेसाठी प्रोत्साहन.
-    Minimum Government- Maximum Governance चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनावश्यक कार्यपद्धती, नाहरकत प्रमाणपत्रे, परवाने वगळण्याचा निर्णय
·        राज्यातील उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण व्हावे यासाठी शासनाने आवश्यक परवाने, अनुज्ञप्ती मंजूर करण्याचे दिवस कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत.



·        राज्य सरकारने अनेक पारदर्शी उपक्रम सुरु केले आहेत:
-    ३ लाखावरील खरेदी किंवा कामासाठी ई- निविदा काढणे बंधनकारक
-    १ लाखापेक्षा जास्त किंमतीसाठी ई- लिलाव बंधनकारक
-    म्हाडा तर्फे घर नोंदणी, टेक्सी परवाने यासाठी ऑनलाईन अर्ज
-    राज्य सरकारी नोकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणार
·        शासनाच्या विविध विभागांची कार्यक्षमता अधिक वाढावी तसेच पारदर्शकता यावी यासाठी आर्थिक तसेच प्रशासकीय अधिकार क्षेत्रीय स्तरावर देऊन निर्णय प्रक्रियेतील टप्पे कमी करून सुलभता आणण्यात आली आहे.
-    महसूल विभागात तहसीलदार याचे अधिकार नायब तहसीलदार यांना.
-    वन विभागात मुख्य वनसंरक्षक यांचे अधिकार विभागीय वन अधिकारी यांना
-    अन्न व औषध प्रशासनात आयुक्तांना अधिकार
-    नगर भूमापन विभागात अधिकारांचे विकेंद्रीकरण
·        नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मालमत्तेचे वार्षिक विवरण भरणे बंधनकारक.          हे विवरण वेबसाईटवर टाकण्यात येईल.
·        शासनाने यापूर्वीची प्रतिज्ञापत्रे देण्याची पद्धत बंद केली असून विविध अर्जांचे नमुने सुलभ केले आणि स्वप्रमाणित कागदपत्रे स्वीकारण्याची पद्धत सुरु केली.
·        राज्य शासनाने मंत्रालय आणि क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ई- गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुरु केली असून येणाऱ्या वर्षांमध्ये कार्यालये कागदविरहित करण्यावर भर असेल.
·        ८५ नागरी सेवा केंद्रे ऑनलाईन करण्यात आली असून ती राज्य शासनाच्या ऑनलाईन पोर्टल- महाऑनलाईन वर उपलब्ध आहेत.
·        “ आपले सरकार” हे वेब पोर्टल आणि मोबाईल एप्लिकेशन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु असून धोरण ठरविण्यामध्ये नागरिकांच्या सुचना तसेच तक्रारी देखील स्वीकारण्यात येणार आहेत.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा