डेंग्यूबाबत जनजागृतीसाठी
सोशल मिडियाचाही वापर करावा
-
मुख्यमंत्री
मुंबई, दि. 7: राज्यात डेंग्यूचे वाढते प्रमाण पाहता या आजाराचा
फैलाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे.
डेंग्यूबाबत इतर उपायांबरोबरच सोशल मिडियाचाही जनजागृतीसाठी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
डेंग्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा आज
मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी मुख्य सचिव स्वाधीन
क्षत्रिय उपस्थित होते. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी
डेंग्यूबाबतची खबरदारी व मुंबई महानगरपालिका करीत असलेल्या उपायांबद्दल सादरीकरण
केले.
डेंग्यूबाबत रेडिओ जिंगल्स, रिक्षा-टॅक्सी, प्रसार फेरी याद्वारे
जनजागृती करण्यात येत आहे. मुंबईत 227 फवारणी यंत्रांद्वारे डास प्रतिबंधक धूर फवारणी केली
जात आहे. एखाद्या घरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील 500 घरांची तपासणी
करण्यात येत आहे. तसेच 900 वर्कर्स
डेंग्यूच्या अळया शोधण्यासाठी घरोघरी भेट
देऊन तपासणीचे काम करीत आहेत. त्यांच्याद्वारे दररोज 50 ते 60 घरे या प्रमाणात
साडेदहा लाख घरे तपासली जाणार आहेत. अशी माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली.
डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी हे लोकांना
समजावून त्याविषयी जनजागृती होणे महत्वाचे
आहे. या जनजागृतीच्या कामामध्ये राज्यातील काही महत्वाच्या सिलेब्रिटीजना सहभागी
करुन घेण्यात यावे. सिलेब्रिटीजद्वारे टिवटरवरुन डेंग्यू विषयक आजाराची जनजागृती
जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविता येईल. तसेच येत्या 14 नोव्हेंबर पासून सुरु
होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये डेंग्यूबाबत घ्यावयाची काळजी व स्वच्छता या
अभियानाचाही समावेश करण्यात यावा,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा