जवखेड्यास मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
अहमदनगर- दिनांक 30- मुख्यमंत्री श्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज पाथर्डी
तालुक्यातील जवखेडे (खालसा) येथे जाऊन
जाधव कुटुंबियांची भेट घेऊन
सांत्वन केले. हत्याकांडातील आरोपीचा शोध
लावून त्यांना कठोरातील कठोर
शिक्षा देण्यास प्राधान्य राहील, चुकीच्या व्यक्तींवर
कारवाई होणार नाही,
असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी आमदार
शिवाजीराव कर्डीले, आमदार मोनिका राजळे, अभय आगरकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे तसेच
इतर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा