छ.
शिवाजी फिश मार्केटचा विज-पाणी पुरवठा
त्वरित
सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मासे
व्यापाऱ्यांसोबत श्री चव्हाण यांची बैठक
मुंबई, दि. 9 : दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील
छत्रपती शिवाजी फिश मार्केटमधील विज आणि
पाणी पुरवठा त्वरित सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
या मार्केटमधील मासे व्यापाऱ्यांसोबत
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मार्केटची पाच मजली इमारत जुनी झाली
असुन तिचे वरचे चार मजले पाडण्याचा निर्णय या बैठकीत झाला. वरचे चार मजले पाडुन
तळजल्याचा धोका कमी करण्यात येणार आहे. तळमजल्यावरील फिश मार्केट सद्या आहे तेथेच
ठेवण्यात येणार आहे. या मार्केटच्या जवळच असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये घाऊक
फिश मार्केटसाठी नवीन इमारत बांधली जाईल आणि सद्याचे छ. शिवाजी फिश मार्केट या
नवीन इमारतीत कायमस्वरुपी स्थलांतरित करण्यात येईल. त्यानंतर सद्याच्या फिश
मार्केटच्या जागी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात
तळमजल्यावरील बंद केलेला विज आणि पाणी पुरवठा सुरु करण्याची व्यापारी शिष्टमंडळाची
मागणी श्री. चव्हाण यांनी मान्य केली.
छत्रपती शिवाजी फिश मार्केटमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बळवंतराव पवार, ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पाटील, उपाध्यक्ष रमेश सिंग, शौकत अली, सचिव विलास
पाटील, सदस्य राजाराम पाटील, प्रदीप लोखंडे, आदींनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन
त्यांना समस्यांबाबतचे निवेदन दिले व चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे आदेश
दिले. या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त (अ.का.) राजीव जलोटा, अतिरिक्त आयुक्त
संजय देशमुख, उपायुक्त (विशेष) राजेंद्र वळे, सहायक आयुक्त रमेश पवार उपस्थित
होते.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा