मुंबई
मेट्रो – ३ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे
२६
ऑगस्टला होणार अंधेरी येथे भूमिपुजन
मुंबई, दि. २२ : राज्यातील अत्यंत
महत्वाच्या अशा मुंबई मेट्रो - ३ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपुजन २६ ऑगस्ट
रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले निमंत्रण
केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडु यांनी स्वीकारले. माजी केंद्रीय मंत्री
श्री. शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचे
निमंत्रण श्री. चव्हाण यांनी दिले आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेले श्री. नायडु यांनी आज श्री. चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. याबाबत कालच श्री. चव्हाण
यांची श्री. नायडु यांना नागपूर येथे
दूरध्वनीवरुन भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण दिले होते.
यानंतर राज्यातील नगरविकास विभागाचे विविध प्रकल्प व प्रश्नांसदर्भात श्री.
चव्हाण आणि श्री. नायडु यांच्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यानंतर
झालेल्या बैठकीच्या सुरुवातीला श्री. चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. नायडु
यांचे स्वागत केले. या महत्वांकाक्षी प्रकल्पासाठी जपानच्या ‘जायका’ने तेरा हजार कोटी रुपयांचे
कर्ज मंजूर केले आहे. त्याचबरोबर पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला लवकरच केंद्रीय
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल, असे श्री. नायडु यांनी जाहीर केले.
यावेळी झोपडीमूक्त महाराष्ट्र व
याबाबतच्या विविध उपक्रमांची आणि
समस्यांची माहिती श्री. नायडु यांना देण्यात आली. मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या
मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करुन मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या उभ्या झाल्या आहेत.
याबाबत केंद्र सरकारने एसआरएसारखे धोरण निश्चित करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात
आली.
वेगाने होत असलेल्या नागरीकरणामुळे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे
प्रशासन आव्हानात्मक बनु लागले आहे. लोकनियुक्त प्रतिनिधींच्या अपेक्षा आणि
जनतेसाठी नागरी सुविधांचे प्रश्न सोडविणे, यादृष्टीने अखिल भारतीय पातळीवर नागरी
प्रशासनासाठी प्रशासकीय व्यवस्था असावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी केले. श्री. व्यंकय्या नायडु यांनी याला अनुमोदन दिले.
बैठकीला केंद्र सरकारच्यावतीने केंद्रीय गृहनिर्माण व नागरी गरीबी निर्मूलन
सचिव श्रीमती अनिता अग्निहोत्री, केंद्रीय नागरविकास सचिव शंकर अगरवाल तर राज्य
सरकारच्यावतीने मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु. पी.
एस. मदान, म्हाडाचे उपाध्यक्ष सतीश गवई, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम
कुंटे, नगरविकासाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव व श्रीकांत सिंह, गृहनिर्माण
सचिव देवाशिष चक्रवर्ती आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००००
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा