मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

पवई येथे स्वस्त घरे मिळणार असल्याची
योजना बनावट : बोगस अर्जांना नागरिकांनी फसू नये
मुंबई, दि. 4 : पवई एरीया डेव्हलपमेंट योजनेंतर्गत अतिशय स्वस्त दरात गरीबांसाठी घरे देण्यासाठी बनावट अर्ज तयार करून वाटण्यात आल्याचे निदर्शनास आले असून अशी कुठलीही योजना नाही, असे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असा छापील अर्ज तयार करून त्याच्या प्रती काढून लोकांना वाटल्यामुळे मंत्रालयात मुख्यमंत्री टपाल कक्षात हा अर्ज भरून देण्यासाठी गर्दी झाली होती. हा अर्जाचा नमुना हा पूर्णपणे बनावट असून लोकांनी अशा कुठल्याही प्रकारांवर विश्वास ठेऊ नये, असे शासनाने स्पष्ट केले आहे. या बनावट अर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासही पोलिस यंत्रणेला सांगण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा