मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याला
केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई, दि.27 : मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला
केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी
पाठविला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकल्पाच्या मान्यतेसाठी पंतप्रधान,
रेल्वेमंत्री यांची अनेकवेळा भेट घेऊन पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प मुंबईच्या
परिवहन व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे.
कुलाबा - वांद्रे – विमानतळ – सीप्झ असा हा 32 किलोमीटरचा मार्ग असून त्यावर 27 स्थानके असणार आहेत. हा संपूर्ण मार्ग
भूमिगत (अंडरग्राऊंड) असून त्यावरुन रोज 22 लाख प्रवासी प्रवास करतील. या प्रकल्पाचा खर्च
24 हजार 340 कोटी रुपये आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र
शासनामार्फत प्रत्येकी 50
टक्के निधीची उभारणी केली जाणार
आहे. या प्रकल्पाची सुरुवात चालु आर्थिक वर्षात होणार असून सहा वर्षात तो पूर्ण
होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास
प्राधिकरणाच्यावतीने हा प्रकल्प राबविला जाईल. दक्षिण मुंबई आणि बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स
ही दोन व्यापारीदृष्ट्या महत्वाची ठिकाणे, तसेच विमानतळ यासाठी हा प्रकल्प खुप महत्वाचा
ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा