स्व. नाईक जन्मशताब्दीचा
समारोप मुंबईत 1 जुलै रोजी
मुंबई, दि. 13: हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी समारोप कार्यक्रम मुंबईत 1 जुलै रोजी
आयोजित करावा. तसेच नागपूर येथे राष्ट्रीय स्तरावर कृषी मेळाव्याचे आयोजन करावे
असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिले.
स्व.वसंतराव
नाईक यांच्या जन्मशताब्दी समारोह कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्या संदर्भात
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे
बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस उप
मुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृह मंत्री
आर.आर.पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व
औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, सामान्य
प्रशासन राज्यमंत्री फौजिया खान, आमदार
संदीप बजोरिया, माजी खासदार हरिभाऊ राठोड, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया
तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दिनिमित्त नागपूर येथे केंद्र शासन व राज्य शासनाच्या
सहकार्याने भव्य राष्ट्रीय स्तरावरील कृषी मेळावा आयोजित करावा. याबरोबरच
राज्यातील इतर 5 विभागात विभागीय स्तरावरील कृषी मेळाव्याचे आयोजन करावे, असे
सांगून मुख्यमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, मराठवाडा कृषी विद्यापिठाला
स्व. वसंतराव नाईक यांचे नांव देण्यासंदर्भात आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करावी.
स्व. वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित तयार करण्यात आलेला लघुपट दूरदर्शनवर
दाखविण्याबाबतची कार्यवाही करावी. त्यांच्या जीवनावर प्रकाशित करण्यात आलेल्या
महानायक या पुस्तकाच्या पुर्नआवृत्ती काढावी. त्यांच्या जीवनावर प्रकाशित करण्यात
आलेल्या लोकराज्य विशेष अंकाचे पुर्नमुद्रण करुन त्याचे वितरण करावे. त्यांच्या
जीवनावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करावे. मुंबई, पुणे या ठिकाणी नोकरी
करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाने सुरु करावीत. पुसद
येथे त्यांचे स्मारक उभारण्याची कार्यवाही करावी. नवीन पिढीला स्व.नाईक यांच्या
कार्याची ओळख व्हावी यासाठी पाठ्यपुस्तकात स्व.वसंतराव नाईक यांच्या जीवनावरील धडे
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी. स्व. वसंतराव नाईक यांच्या नावे
टपाल तिकीट काढण्यासाठी पाठपुरावा करावा. त्यांच्या विधी मंडळातील भाषणाचे पुस्तक
तयार करुन त्यांचे प्रकाशन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित
अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक रस्त्यालगत
कृषी विभाग व खाजगी संस्थांच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाला
स्व.वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे. त्यांच्या नावे नागपूर येथे भव्य सभागृह तयार
करावे अशा सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या.
* * * * *
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा