छत्रपती
शिवाजी महाराजांच्या
स्मारकासाठी
संभाव्य जागेची पाहणी
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी
महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून आज
अरबी समुद्रातील संभाव्य जागेची पाहणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी सांगितले.
आज मुख्यमंत्री श्री. चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहराचे
पालकमंत्री तथा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंत पाटील, आमदार विनायक मेटे, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया यांनी
स्मारकासाठी अरबी समुद्रातील संभाव्य
जागेची पाहणी केली. त्यानंतर बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी स्मारकाशी
संबंधित सर्व शासकीय यंत्रणांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित
होते.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी मुंबई
शहराचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली
असून त्यांनी निश्चित केलेल्या काही संभाव्य जागांची आज पाहणी केल्याचे सांगून
मुख्यमंत्री म्हणाले की, या स्मारकासाठी विविध प्रकारच्या 25 मान्यता आवश्यक आहेत.
त्या मिळविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. येत्या
काही दिवसांमध्येच केंद्रीय पर्यावरणमंत्री मुंबईत येत आहेत. या भेटीदरम्यान
त्यांच्यासमोर स्मारकासंबंधीचे सादरीकरण करण्यात येऊन चर्चा केली जाईल. पर्यावरण मंत्रालयाच्या मान्यतेबरोबरच इतर
आवश्यक मान्यताही लवकरात लवकर घेऊन स्मारकाच्या कामाला गती
देण्यात येईल.
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा