रविवार, ३१ मार्च, २०१३


मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते रविंद्र नाट्य मंदीर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हजारो नेत्ररुग्णांसाठी दृष्टीदाता ठरलेले नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा `प्रहार भूषण  जीवनगौरव`ने सन्मान करण्यात आला. यावेळी उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ.निलेश राणे, स्वाभिमानचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे आदी मान्यवर 




महाराष्ट्रातील नररत्ने शोधण्याच्या उपक्रमाची `प्रहार`ची  संकल्पना कौतुकास्पद - मुख्यमंत्री
            मुंबई,दि. 31:  महाराष्ट्र ही रत्नांची खाण आहे.  ही नररत्ने शोधुन त्यांचा सन्मान करण्याच्या  उपक्रमाची `प्रहार`  ची संकल्पना खरोखरच कौतुकास्पद आहे,  असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे काढले.
            रविंद्र नाट्य मंदीर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात हजारो नेत्ररुग्णांसाठी दृष्टीदाता ठरलेले नेत्र चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते `प्रहार भूषण  जीवनगौरव`ने सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ.निलेश राणे, स्वाभिमानचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले,  खडतर परिस्थितीतून विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या व्यक्तींचा शोध घेणे  कठीण असून हे काम प्रहारने हाती घेतले आहे. ते सतत पुढे चालू राहील आणि या वर्षीचा सत्कारमूर्ती कोण ?  याची  जनता प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केली.
            उद्योगमंत्री श्री.राणे यावेळी म्हणाजे की, प्रहार हे वृत्तपत्र, व्यवसाय म्हणून नव्हे तर पत्रकारितेतील धर्म  म्हणून प्रामाणिक आणि निर्भिडपणे काम करीत आहे. चांगल्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच सामाजिक जाणीव व बांधीलकीचा  वसा प्रहारने घेतला आहे.
            श्री.भुजबळ यावेळी म्हणाले की, प्रहार  सकारात्मक दृष्टी ठेवून आपली  वाटचाल करीत आहे,  ही बाब समाधानकारक आहे. प्रहार भूषण सन्मानासाठी निवडलेल्या  व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजभूषण आहेत, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.
            या सन्मान सोहळ्यात वाडा तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी अनिल पाटील, पर्यटन क्षेत्रात  स्वत:चे अढळपद निर्माण करणारे  उल्हास खातू, धडाडीचे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे  पाटील,  सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत, आजच्या पिढीतील आघाडीचे दिग्दर्शक   रवी जाधव, अभिनेता जितेंद्र  जोशी, शिक्षण क्षेत्रातील सुधीर दिक्षीत, गजालीचे मालक चंद्रकांत शेट्टी आणि दिल्लीवर मराठीचा झेंडा रोवणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट  पुरस्कार विजेत्या मराठी कलाकारांचा यावेळी सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ  देवून सत्कार करण्यात आला.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा