अर्थसंकल्पीय अधिवेशनात 9
नवीन विधेयके
राज्यासमोरील दुष्काळाचा मुकाबला
करण्यासाठी
विरोधकांनी सहकार्याची भूमिका
घ्यावी - मुख्यमंत्री
मुंबई, दि. 10 मार्च: राज्य विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवार, दि. 11 मार्च पासून सुरु होत असून, या अधिवेशनात प्रामुख्याने
दुष्काळासह अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. विरोधकांनी यात सहकार्याची
भूमिका घेऊन कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता राज्याच्या विकासाच्या दृष्टीने
सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या
अधिवेशनात 9 नवीन विधेयके मांडण्यात येणार आहेत. मागील 3 विधेयके प्रलंबित असून 5
अध्यादेश पटलावर मांडण्यात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दुष्काळाला तोंड देण्यासाठी
शर्थीचे प्रयत्न
राज्यातील काही भागांमध्ये आज दुष्काळाची भीषण
परिस्थिती आहे. सलग दोन वर्षे दुष्काळ
पडल्याने हे फार मोठे जलसंकट राज्यावर आले आहे. आहे. मराठवाड्यातील त्याचप्रमाणे
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई आहे. राज्यातील
प्रत्येकाला पिण्याचे पाणी पुरविणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने
राज्य शासनाने केंद्र सरकारच्या मदतीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. अशा
परिस्थितीत पुढील 3 ते 4 महिने कसोटीचे असून, आपल्याला दुष्काळग्रस्त भागाला
प्राधान्याने पिण्याचे पाणी पुरवावे लागेल. त्याचप्रमाणे जनावरेही जगवावी लागतील.
यादृष्टीने या अधिवेशनात विरोधी पक्षांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला
सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दुष्काळासंदर्भात उपाययोजना
करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी (दुष्काळ) असा नवीन मदत निधी स्थापन करण्यात
आला आहे. या निधीमध्ये रोख रक्कम तसेच चारा, पाण्याच्या टाक्या अशा प्रकारची
वस्तुरुप मदत करण्यासाठी दानशूर व्यक्ती, उद्योजक, सामाजिक संस्था आदींनी पुढे
यावे असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
या अधिवेशनात 9 विधेयके
मांडण्यात येणार आहेत. ती खालीलप्रमाणे:-
नवीन 9 शासकीय विधेयके
1. एक पडदा चित्रपटगृहाच्या
मालकांना करमणूक शुल्क माफी देण्याबाबत.
मुंबई करमणूक शुल्क (सुधारणा) विधेयक 2013.
2. 2013-14 वर्षाकरीता नवीन
शाळांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याबाबत.
महाराष्ट्र स्वयं-अर्थ सहायित शाळा (स्थापना विनियमन) (सुधारणा) विधेयक 2013.
3. 97 व्या घटना दुरुस्तीच्या
अनुषंगाने सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा करण्याबाबत.
महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक 2013.
4. 2005-06 आणि 2008-09 या
कालावधीसाठी मुल्यवर्धित कर निर्धारणाची मुदत 30 जून 2013 पर्यंत वाढविणे.
महाराष्ट्र मुल्यवर्धित कर (सुधारणा) विधेयक 2013.
5. एकात्मिकृत औद्योगिक वसाहती
स्थापन करणे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास (सुधारणा) विधेयक 2013.
6. सर्वोच्च न्यायालयाच्या
आदेशानुसार राज्य विधानमंडळाला गौण खनिजावरील उपकर आकारण्याचा अधिकार नसल्याने
जिल्हा परिषदांना उपकर आकारण्याची तरतूद वगळण्याबाबत.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा विधेयक 2013.
7. महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन
विधेयक 2013.
8. महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान)
विधेयक 2013.
9. महाराष्ट्र विनियोजन विधेयक
2013.
(ब) प्रलंबित विधेयके
1) मुंबईचा शेतांवरील कीड व रोग याबाबत अंमलबजावणीचे अधिकार
अनुसूचीत क्षेत्रांतील पंचायतींना अधिनियमाच्या 2010 विधेयक (सुधारणा)
2) महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवी प्रथा व नरबळी व अन्य
अमानवी प्रथा व 2011, त्यांचे समूळ
उच्चाटन विधेयक जादूटोणा यांना प्रतिबंध
3) महाराष्ट्र नगर परिषदानगर पंचायती व अधिनियमाखालील न्यायिक
2012, विधेयक (सुधारणा) औद्योगिक नगरीवत बाबींचे
अधिकार नगर विकास खात्याचे मंत्री यांनी प्राधिकिृत केल्यास संबंधित सचिव यांनाही
वापरता येतील अशी स्पष्ट तरतूद.
(क) प्रख्यापित अध्यादेश (पटलावर
मांडावयाचे)
1) आकस्मिकता निधीची मर्यादा
तात्पुरती वाढविणेबाबत महाराष्ट्र आकस्मिकता निधी (सुधारणा)
अध्यादेश, 2013
2) 97
व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा महाराष्ट्र
सहकारी संस्था (सुधारणा) अध्यादेश
3) सन 2013-14 या वर्षाकरीता नवीन
शाळा सुरु करण्याकरिता अर्ज करण्याची मुदत वाढविण्याबाबत महाराष्ट्र स्वयं- अर्थ
सहायिता शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2013
4)एक पडदा चित्रपटगृहांच्या
मालकांना करमणूक शुल्क माफीबाबत मुंबई करमणूक शुल्क (सुधारणा) अध्यादेश, 2013
5) सन 2005-06 आणि 2008-09 या
कालावधीसंबंधात मुल्यवर्धित कर निर्धारणाची मुदत मर्यादा 30 जून 2013 पर्यंत
वाढवणे. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर (सुधारणा)
अध्यादेश, 2013
आज आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता. चहापानाच्या
वेळी अधिवेशनाच्या दृष्टीने विविध मुद्यांवर झालेल्या चर्चेत आमदार गणपतराव
देशमुख, आमदार कपिल पाटील यांनी सहभाग घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,
आमदार माणिकराव ठाकरे, आमदार मधुकर पिचड, त्याचप्रमाणे मंत्रिमंडळातील सदस्य
उपस्थित होते.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा