विज्ञानधिष्ठित समाजासाठी राज्यात विज्ञान केंद्रे उभारणार - मुख्यमंत्री
पुणे.
दि.8 विज्ञानाधिष्ठित समाजनिर्माणासाठी
प्रत्येक विभाग पातळीवर आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एक विज्ञान केंद्र
केंद्रीय सांकृतिक मंत्रालयाच्या मदतीने राज्यात निर्माण करु अशी महत्वपूर्ण घोषणा
मुख्यमंत्र्यांनी आज केली.
पिंपरी-
चिंचवड येथे पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि
राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या वतीने
उभ्या केलेल्या विज्ञान केंद्राच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री चंद्रेशकुमारी कटोच, उपमुख्यमंत्री अजित पवार,
खा. शिवाजीराव आढळराव पाटील,खा. रजनीताई पाटील, विज्ञान संग्रहालय परिषदेचे
अध्यक्ष आर.सी. सोबती, आ. विलास लांडे, आ. अण्णा बनसोडे, आ. लक्ष्मण जगताप,आ. बापु
पठारे, महापौर मोहिनी लांडे, आयुक्त श्रीकर परदेशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
महाराष्ट्रात
अशा प्रकारचे चवथे विज्ञान केंद्र सुरु होत असल्याचा आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पुणे विद्या नगरी आणि पिंपरी चिंचवड ही उद्योग नगरी
आहे. या दोन्ही बाबीसाठी देशातल्या विविध भागातून लोक येतात. त्यामुळे हे विज्ञान
केंद्र अधिकाधिक लोकांमध्ये विज्ञाननिष्ठता आणण्यासाठी मदत करेल. आपल्या देशात
अतिशय चांगले मनुष्यबळ असून अजूनही विज्ञान आणि गणिताकडे आपला फ़ारसा कल गेलेला
नाही, या दोन्ही बाबी आधुनिक समाजाच्या जडण घडणीमध्ये अतिशय महत्वाच्या असल्यामुळे
त्याचेकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दुर्देवाने आपल्याकडील शिक्षण देणारे एकही
विश्वविद्यालय जगातील सर्वाच्च 200 विश्वविद्यालयामध्ये नाही याचा गांभिर्याने
विचार होणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आपल्याला
आजही 6 लाख कोटी रुपयांचे तेल आयात करावे लागते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,
पर्यावरणाचे संवर्धन महत्वाचे असल्यामुळे खनिज काढण्यावर असलेल्या मर्यादा, यावर
मात करण्यासाठी पर्याय शोधणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्र्यांनी हाच
प्रगतीचा वेग़ कायम ठेवायचा असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपल्याला प्रगती
करावी लागेल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या विज्ञान सेंटरच्या उभारणीसाठी
पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
विज्ञान
हे दोन पिढ्यातील अंतर कमी करणार साधन असल्याचे सांगून विज्ञान आणि संशोधक यांचे
उपमुख्यमंत्री अजित पवार महत्व विशद केले. विज्ञानाचा दृष्टिकोन युवकांमध्ये
निर्माण होण्यासाठी, अंधश्रध्दा कमी करण्यासाठी हे विज्ञान केंद्र महत्वाची भूमिका
बजावेल आशावाद उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक प्रश्न सोडवून ही
उद्योग नगरी आधुनिक नगर बनविण्यासाठी जे जे म्हणून गरजेचे आहे ते करण्यासाठी शासन
प्रयत्नशील असल्याचे सांगून स्थानिक आमदार आणि मुख्यमंत्री आणि आपण यावर चर्चा
केली असून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री चंद्रेशकुमारी कटोच यांनी विज्ञान केंद्र निर्माण
करण्यासाठी मदत करु अशी ग्वाही यावेळी दिली. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या
पंतप्रधानकीच्या काळात कृषी आणि उद्योग यावर त्यांनी विशेष भर दिला राजीव गांधी
यांनी माहिती तंत्रज्ञानावर भर दिल्यामुळे हे आजचे चित्र दिसत असल्याचे कटोच यांनी
स्पष्ट केले.
या
विज्ञान केंद्राचे आर.सी. सोबती यांनी महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याकडे
यावेळी हस्तांतरण केले. या विज्ञान केंद्रासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा