बकरी ईदनिमित्त मुख्यमंत्र्यांचा संदेश
त्याग आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लागावी
मुंबई, दि.23: मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी बकरी ईद निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, बकरी ईद या सणामुळे
त्यागाची भावना, सामाजिक ऐक्य वाढीस लागते. समाजातील प्रत्येक घटकामध्ये
मैत्रीचा आणि बंधूत्वाचा संदेश देणारा हा
सण राष्ट्रीय एकात्मता आणि शांतता प्रस्थापित करणारा आहे. महाराष्ट्राने नेहमीच
सामाजिक सौहार्द आणि ऐक्याचा पुरस्कार केला आहे. बकरी ईदच्या मंगलप्रसंगी आपण सारे
हे सामाजिक ऐक्य वाढीस लागण्यासाठी मिळून काम करु या आणि सर्वधर्मसमभावाचे पालन
करुन या तत्वाचा सर्वत्र प्रसार करु यात.
या पवित्र दिनी आपण सगळे त्याग, ईश्वराप्रती प्रेम आणि
समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्याची समर्पण वृत्ती अंगिकारण्याची शिकवण देऊ
यात, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा