अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून
आपत्तीच्या प्रसंगी काम करणार
अभियंत्यांचा मुख्यमंत्र्यांना विश्वास
मुंबई, दिनांक 26 जून : मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर आता कर्मचारी झपाट्याने
कामाला लागले असून अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट
घेतली आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी सोपविल्यास ती वेळेत पार पाडण्याचा निर्धार
व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आणि अशा अडचणीच्या प्रसंगी इतरही अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी या अभियंत्यांसारखा निर्धार व्यक्त करून या पुनर्निर्माणाच्या
कामी मदत करावी असे आवाहन केले.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाचे अध्यक्ष इंजि.राजेंद्र पवार,
उपाध्यक्ष इंजि.ए.व्ही.देवधर, अधीक्षक अभियंता श्री.देबडवार त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी
यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या अभियंत्यांवर जी जबाबदारी सोपविली जाईल ती संपूर्ण अभियांत्रिकी
कौशल्य पणाला लावून, गुणवत्ता राखून आणि वेळेच्या मर्यादेत पूर्ण करण्याच्या या
अभियंत्यांच्या निर्धारामुळे प्रशासनाचे मनोबल निश्चितपणे वाढेल, असेही
मुख्यमंत्री म्हणाले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा