प्रत्येक घटकाच्या विकासाचे राज्य शासनाचे
ध्येय
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमत्र्यांचा
संदेश
मुंबई, दि. 1 मे : सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे ध्येय
राज्य शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यासाठी पारदर्शक आणि गतिमान शासन देण्याचा राज्य
शासनाने निर्धार केला आहे. यामुळे राज्याचा विकास होण्यास मदत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री
पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त व्यक्त केला आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील
हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या
संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, राज्याचा सर्वांगिण विकास होण्यासाठी प्रादेशिक
समतोल राखण्यात येईल. आवश्यक सुविधा उपलब्ध करून राज्याच्या प्रत्येक भागाच्या
विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईची
समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासन
गांभिर्याने प्रयत्न करीत आहे.
औद्योगिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रात महाराष्ट्र
अग्रेसर असला तरी येत्या काळात राज्याला एका अत्युच्च पातळीवर नेण्याचा संकल्प
यानिमित्ताने करूया, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे
---00---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा