भूसुरुंग स्फोटातील जखमी
जवानांची
मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
जवानांच्या
पाठीशी राज्य व केंद्र सरकार असल्याचा दिलासा देऊन मुख्यमंत्र्यांनी जवानांचे
मनोधैर्य वाढविले. या घटनेत 12 जवान शहीद
झाले होते. तर 28 जवान जखमी झाले होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समवेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख,
रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष
माणिकराव ठाकरे होते.
***
अमर काळे यांचे
मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
नागपूर,दिनांक
2 : आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांच्या मातोश्री श्रीमती सरला शरद काळे
यांचे आज शंकरनगर येथील वोकार्ट रुग्णालयात दु:खद निधन झाल्याची माहिती नागपूरच्या
दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्र्यांना मिळाल्याने मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन
आस्थेने विचारपूस करून संवेदना व्यक्त केल्या. श्रीमती सरला काळे ह्या अन्न व नागरी
पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या भगिनी
असल्याने तेथे उपस्थित असलेले देशमुख यांचेही मुख्यमंत्र्यांनी सांत्वन केले.
मुख्यमंत्र्यांसमवेत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र
मुळक होते. रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत, खासदार दत्ता मेघे, खासदार
विलास मुत्तेमवार यांनीही श्री. काळे व श्री देशमुख यांची रुग्णालयात भेट घेऊन
सांत्वन केले. श्रीमती काळे ह्या माजी आमदार डॉ. शरद काळे यांच्या पत्नी होत. त्या
64 वर्षाच्या होत्या. त्यांना दोन अपत्य आहेत. आज सायंकाळी आर्वी येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात
आला.
***
राजकीय
व सामाजिक क्षेत्राची जाण असणारा नेता हरपला .. मुख्यमंत्री
एन.के.पी.साळवे यांचेवर
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नागपूर,दिनांक
2 : एक उत्कृष्ट
संसदपटू, अर्थशास्त्राचा जाणकार आणि सामाजिक व राजकीय क्षेत्राची जाण असणारा नेता
हरपल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात
सांगितले.
कॉग्रेसचे
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री एन.के.पी. साळवे याचे काल दिल्लीत निधन झाले.
त्यांचे पार्थिव काल रात्री (ता.1) नागपुरात आणण्यात आले. श्री. साळवे यांच्या
अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्र्यांचे आज सकाळी 9 वाजता नागपुरात आगमन झाले. विमानतळावरून
थेट त्यांच्या सराफ चेंबर्स मागील निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी अत्यंदर्शन
घेतले व पुष्पचक्र अर्पण केले.
विदर्भ क्रिकेट असोसिएसनजवळील
ऑल सेंट कॅथेड्रल चर्च येथे श्री. साळवे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरून
सजविलेल्या ट्रकमध्ये आणले गेले. चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना घेण्यात आली.
त्याप्रसंगी झालेल्या शोकसभेत मुख्यमंत्री म्हणाले, साळवे हे अष्टपैलू
व्यक्तिमत्वाचे धनी होते. राजकीय जीवनात त्यांनी जपलेली निष्ठा व त्यांचे कार्य
समाजासाठी कायम प्रेरणादायी ठरेल. उत्कृष्ट संसदपटू, सुसंस्कृत नेते आणि
विदर्भातील अष्टपैलू नेतृत्व असलेले साळवे राजकारणात अनेकांचे मार्गदर्शक होते.
राजकारणात असूनही कला, साहित्य, क्रीडा आणि गायन क्षेत्रावर ते मनापासून प्रेम करीत
होते. केंद्रात मंत्री असतांना त्यांनी
ऊर्जा क्षेत्रात खाजगीकरण व परदेशी गुंतवणूकदारांना मुभा देण्यात महत्वाची
भूमिका बजावली. राजकारणासोबतच त्यांनी क्रिकेट क्षेत्रत उल्लेखनीय कार्य केले, अशा
शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
श्रीमती
अंबिका सोनी
केंद्रीय
माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनी
केंद्र शासनाच्यावतीने शोकसंवेदना व्यक्त करतांना म्हणाल्या, काँग्रेसमध्ये
आणि सरकारमध्ये त्यांच्या शब्दाला मान होता. राजकारणात राहूनही त्यांनी क्रीडा
क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. अनेक सामाजिक उपक्रमाचे पालकत्व स्वीकारणारा एक
सुसंस्कृत नेता साळवे यांच्या निधनाने गमावल्याचे त्या म्हणाल्या. केंद्रीय अवजड
उद्योग मंत्री श्री. प्रफुल पटेल,
महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महापौर अनिल सोले, खासदार विलास
मुत्तेमवार, ॲड. हरिष साळवे, श्रीमती शशीकला आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
केंद्रीय
मंत्री एन.के.पी.साळवे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळी 9 वाजता त्यांचे पार्थिव व्ही.सी.ए. स्टेडियमजवळील ऑल सेंट कॅथेड्रल
चर्चमध्ये सजविलेल्या ट्रकमधून आणण्यात आले. तेथे प्रार्थना सभा घेऊन त्यांचे
पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळण्यात आले. त्यानंतर तेथेच पोलीस जवानांनी अखेरची
सलामी दिली. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा कामठी मार्गाने जरीपटका भागातील ख्रिश्चन
स्मशानभूमित नेण्यात आली आणि तेथे त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण, केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, प्रफुल पटेल, खासदार विलास मुत्तेमवार,
खासदार दत्ता मेघे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत,
महापौर अनिल सोले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्यमंत्री
राजेंद्र मुळक, माजी मंत्री प्रतापराव भोसले, माजी खासदार जाबुवंतराव धोटे, माजी
खासदार सुबोध मोहिते, माजी मंत्री
मधुकरराव किंमतकर, माजी आमदार अशोक धवड, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, नरेश
पुगलिया, आमदार एस.क्यू.जमा, आमदार सुनील केदार, माजी मंत्री रणजीत देशमुख, अरुण
जेजाणी, विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी, पोलीस आयुक्त अंकुश धनविजय, मनपा
आयुक्त संजय जयस्वाल, नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव,
निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी, नगरसेवक
प्रकाश गजभिये, नगरसेवक प्रफुल गुडधे, मनपातील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, मोहबतसिंग
तुली, श्री. जीमी, माजी मंत्री अनीस अहमद, सरदार अटलबहादूरसिंग, माजी न्यायमूर्ती
विकास शिरपूरकर, नाना गावंडे, आशिष
देशमुख, बाबुराव तिडके, माजी जिल्हा सरकारी वकील प्रशांत सत्यनाथन, अशोक धोटे, शफीक
अहमद, नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, डॉ. गोविंद वर्मा, यांचेसह
ॲड. हरिष साळवे, मुलगी अरुणा उपाध्याय, जावई अरुण उपाध्याय, एम.एल.गुप्ता, चर्चचे
मुख्य फादर अब्राहम, बिशप पॉल दुपारे आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील गणमान्य
नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
***
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा