बुधवार, २१ डिसेंबर, २०११

चला नागपूर राजभवनाला निसर्ग निरिक्षणासाठी





चला नागपूर राजभवनाला निसर्ग निरिक्षणासाठी
नागपूर राजभवन येथील भव्य 'जैव विविधता' उद्यान प्रकल्पाचे गुरुवारी राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

     नागपूर येथील हिरव्यागार सेमीनरी हिल पठारावर 1891 साली मध्य प्रांताच्या मुख्य कमिशनरचे निवासस्थान म्हणून बांधण्यात आलेले सध्या महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नागपूर येथील निवासस्थान असलेल्या विस्तीर्ण राजभवन परिसरात तयार करण्यात आलेल्या जैव विविधता उद्यान प्रकल्पाचे उद्घाटन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गुरुवार दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता राजभवन नागपूर येथे संपन्न होत आहे.

     वनस्पती झाडांच्या जैव विविधतेचे जतन व्हावे त्याचबरोबर रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे यांना हक्काचे अभयारण्य मिळावे या हेतूने विद्यमान राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या सूचनेनुसार उद्यानात सुमारे 30 हेक्टर परिसरात चारशे विविध प्रजातींची एकूण 28948 वनस्पतींची लागवड करण्यात आली असून हे उद्यान अल्पावधीतच पर्यावरण प्रेमी, कृषी संशोधक शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.

     प्रकल्पास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पर्यावरण शिक्षणासाठी राजभवन नागपूर बाबत माहिती देण्यासाठी एका 'इंटरप्रिटेशन सेंटर' ची निर्मिती करण्यात येत आहे.


     राजभवन परिसरात पक्ष्यांची विपुल विविधता बघायला मिळते. पक्ष्यांच्या 139 जाती फुलपाखरांच्या 63 जाती येथे आढळल्याचे पक्षी तज्ज्ञांनी नमूद केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या मदतीने, राजभवनमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींची सूची तयार करण्यात आली आहे. येथे जवळ जवळ 50 मोर मुक्त संचार करीत असतात.

     राजभवनाच्या प्रवेशमार्गावर मोठमोठया 812 झाडांची दुतर्फा लागवड करण्यात आली असून यात पाम तसेच सुगंधित फुलझाडांचा समावेश आहे. राजभवन प्रवेशद्वार आतील रस्त्यालगत सहा वेगवेगळया ठिकाणी लॅन्डस्केप्स् विकसित करण्यात आले असून यांत 58 प्रजातींची रोपे वापरण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळा :
सायं 6.30 वाजता : मा. राज्यपाल मा. मुख्यमंत्र्यांचे आगमन निमंत्रितांसमवेत चहापान
सायं 7.15 वाजता जैव विविधता उद्यानाचे उद्घाटन
सायं 8.00 वाजता राज्यपाल मुख्यमंत्री यांची गुलाब उद्यानास भेट

एकट्‌या गुलाबाच्या 257 प्रजाती !

राजभवनच्या उत्तरेस 'गुलाब उद्यान' तयार करण्यात आले असून 4000 चौ. मी. क्षेत्रावर केवळ गुलाबाच्या तब्बल 257 जातींची लागवड करण्यात आली आहे. तसेच फुलपाखरे पक्षी यांना आकर्षित करण्यासाठी एकूण 43 प्रजातींची 1000 रोपे लावण्यात आली आहेत.


: उद्यानातील 'जीव'संपदा :
·        गुलाबाच्या 257 प्रजाती रंगानुसार स्वतंत्र मळे
·        औषधी वनस्पती, झुडपे वेली यांच्या 57 प्रजातींची 1669 रोपे
·        धार्मिक कार्याला लागणाऱ्या फुलांच्या 38 प्रजातींची 924 रोपे
·        पर्यावरण संतुलक, वायू शुध्दीकारक 18 प्रजातींची 323 रोपे
·        शोभिवंत 24 प्रजातींची 596 रोपे
·        बांबूच्या 10 प्रजातींची 228 रोपे
·        पक्षांना आकर्षित करणाऱ्या 13 प्रजातींची 230 रोपे
·        फुलपाखरे आकर्षित करणाऱ्या 30 प्रजातींची 771 रोपे
·        8000 कोरफड रोपे
·        500 फुलझाडे फळझाडे



राजभवन जैव विविधता उद्यानाची रपेट करता यावी याकरिता 1.70 कि.मी. लांबीची 'निसर्ग निरिक्षण' पाऊलवाट तयार करण्यात आली आहे. परिसरातील वृक्षांवर 50 पक्षी घरटी लावण्यात आली आहेत.

जैव विविधता उद्यान प्रकल्पासाठी मँगनीज ओअर इंडिया लिमिटेड या केंद्र सरकारच्या उपक्रमातर्फे संपूर्ण 1.39 कोटी रुपये इतके वित्तसहाय्य देण्यात आले. प्रकल्पाचे कार्यान्वयन महाराष्ट्र वन विकास महामंडळ (FDCM) ने पार पाडले.

संपूर्ण उद्यानाला ठिबक सिंचन पध्दतीने पाणीपुरवठा करण्यात येत असून केंद्रीय भूजल मंडळाने मृद जल संधारणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन आर्थिक सहाय्य उपलब्ध केले.

मृद जल संधारणासाठी एकूण 40 नालाबंधारे 3 लहान बंधारे यांचे काम कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाण्याचा धबधबा इतर बांधकामे करण्यात आली आहेत.

'जैव विविधता' उद्यानामुळे वातावरण शुध्दी होऊन नागपूरकरांना अधिक प्रमाणात प्राणवायू मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

                       

: राजभवन नागपूरचा इतिहास :

नागपूर येथील राजभवन 120 वर्षे जुने आहे. सन 1891 साली ते चीफ कमिशनर, सेंट्रल प्रॉव्हीन्स यांचे निवासस्थान म्हणून बांधण्यात आले होते.  सन 1903 साली वऱ्हाड प्रांत मध्य प्रांताला जोडण्यात आल्यावर, ते सी. पी. ऍ़न्ड बेरार प्रांताच्या चीफ कमिशनरचे निवासस्थान झाले. 1920 साली या निवासस्थानाचे मध्य प्रांताच्या गव्हर्नरचे 'गर्व्हन्मंेट हाऊस' मध्ये रुपांतर झाले.


   19566 साली हे निवासस्थान मुंबई प्रांताच्या राज्यपालांचे 'गर्व्हन्मंेट हाऊस' झाले सन 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ते 'राजभवन' या नावाने महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नागपूर येथील निवासस्थान म्हणून परिचित झाले.


नागपूर राजभवनच्या प्रवेशद्वारातच Erected 1891 : E. Penny Ex. Eng अशी कोनशिला आढळते. 1891 साली सेन्ट्रल प्रॉव्हीन्सेसचे चीफ कमिशनर ए. पी. मॅकडोनेल सर्वप्रथम या निवासस्थानात राहिले.    (संदर्भ : 'राजभवन्स् इन महाराष्ट्र' - लेखक सदाशिव गोरक्षकर)


राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक जर्नेल सिंग यांच्या चमूने जैव विविधता उद्यान निर्मितीचे काम केले.

श्री आर. के. वानखेडे, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळए श्री पी. जी. नौकरकर, सहायक व्यवस्थापक, डॉ आर. के. नांदकर, प्राध्यापक (वनस्पतीशास्त्र), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, डॉ प्रविण चरडे, सदस्य बायोपार्क, श्री दिलीप चिंचमलातपुरे, लॅन्डस्केप तज्ज्ञ, श्री रमेश येवले राजभवने प्रभारी अधिकारी, डॉ अर्चना कडू, सदस्या बायोपार्क या चमूचे सदस्य होते.


(उमेश काशीकर)
राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी
99208 99068 / 022-2367 0098





Governor & CM to unveil Bio Diversity Park at Raj Bhavan Nagpur on 22 December

The wait is over. The much awaited Biodiversity Park (Jaiv Vividhata Udyan) created on the huge expanse of Raj Bhavan in Nagpur over an area of 30 acres is ready for unveiling.

Maharashtra Governor K Sankaranarayanan and Chief Minister Prithviraj Chavan will formally open the biodiversity park at Raj Bhavan in Nagpur at 6.30 p.m. on Thursday, 22 December 2011.

Speaker of Maharashtra Legislative Assembly Dilip Walse Patil, Deputy Chief Minister Ajit Pawar, Minister of Forest Patangrao Kadam, Guardian Minister of Nagpur Shivajirao Moghe and Minister of State for Forests Bhaskar Jadhav will grace the occasion.

The floral and plant biodiversity park showcasing the rich biodiversity of the Gondwana region of Central India will be shortly opened for schools and colleges for environment education purpose.

An Interpretation Centre is being created to explain the importance of plants and their importance in nature to the students using audio-visual display.
1


The Inaugural Programme on 22 Dec.

6.30 PM: Governor K Sankaranarayanan and Chief Minister Prithviraj Chavan arrive for the घ्At Home reception in honour of Members of State Legislature and other invitees

7.15 PM: Inauguration of the घ्Biodiversity Park by Governor K Sankaranarayanan and Chief Minister Prithviraj Chavan in presence Deputy Chief Minister Ajit Pawar, Speaker of the Maharashtra Legislative Assembly Dilip Walse Patil and others

8.00 PM: Governor, CM and other dignitaries to take a walk at the Rose Garden


Created over an area of 30 hectares, a record 28948 plants have been planted at the Biodiversity Park so far. Few more rare species will soon make their way into the Biopark.

An interesting feature of the Biopark is the Rose Garden spread over an area of 4000 sq m. The rose garden has 23 beds with distinct colour pattern. As many as 257 species of roses have been planted at the rose garden. These include 104 species of Floribundas, 106 species of Hybrid Tea roses, 42 species of Miniature roses and 5 species of Climber roses.


What will you see at the Biopark ?
1.  Ethnobotanical collection of 57 species with 1669 plants

2. Plantation of 24 aromatic species with 591 plants.

3.  Sacred species collection of 38 species with 924 plants
4.  Environment friendly and air purifying species of 18 types with 323 plants
5.  Ornamental species of 24 type with 596 plants
6.  Bambusetum with 10 species with 228 plants
7.  Plantation of 40 native species with 1790 plants


8.   Nakshatra Rare, Dashamul and Bulbaceous species plantation of 56 species with 341 plants.
Plants to attract Birds and Butterflies

9. Bird attracting species of 13 varieties with 230 plants
10. Butterfly attracting species of 30 varieties with 771 plants.
11.  Cactii (Nivdung) and Succulent species of 38 varieties with 1250 plants 

Beautiful landscapes have been created on either side of the approach road to Raj Bhavan and a waterfall has also been created to enhance the aesthetic value of the project. Plantation along roadsides has been completed and in all 812 plants of ornamental species, palms, fragrant and flowering trees and shrub species have been planted.

A 1.70 km long nature trail has been created to facilitate the viewing of the Biodiversity Park.

The Raj Bhavan is also a hotspot of birds diversity. In all 139 species of birds and 63 species of butterfly have been spotted in Raj Bhavan complex. The Raj Bhavan Nagpur is also a home to about 50 peacocks. Fifty bird nests have been mounted on trees for the birds to roost.

The Making of the Biopark

The Manganese Ore India Limited (MOIL), a Central Government undertaking provided funds to the tune of Rs 1.39 crore for the biodiversity project. The Forest Development Corporation of Maharashtra implemented the project during the last two years. The Public Works Department of Government of Maharashtra created the waterfall and completed other civil works.
3
Drip Irrigation facility has been created by the Agriculture Department to water the entire biodiversity park.

Work of soil and moisture conservation has been carried out by on the advice and technical guidance of the Central Ground Water Board. The Board carried out survey to prevent soil and water erosion and provided funds for the creation of 43 bunds.

The Team

Under the guidance of Governor K Sankaranarayanan, a team comprising Shri Jarnail Singh, IFS and Regional Manager of Forest Development Corporation of Maharashtra worked on the biodiversity park project.

Members of the team included Shri R K Wankhede, Divisional Manager, FDCM, Shri P G Naukarkar, Assistant Manager, FDCM, Dr P B Nandkar, Professor (Botany), Rastra Sant Tukadoji Maharaj University Nagpur, Dr Pravin Charde, Member, Bio-Park, Shri Dilip Chinchmalatpure, Landscape Consultant, Shri Ramesh Yewale, Officer-In Charge, Raj Bhavan Nagpur, Dr Archana Kadu, Member, Bio-Park

Apart from further enhancing the beauty of Nagpur, the Biodiversity park is sure to serve as a lung to the city and generate more oxygen in the atmosphere


(Umesh Kashikar)
Public Relations Officer
2367 0098 / 99208 99068


4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा