बिराजदार यांच्या निधनाने भारतीय कुस्ती क्षेत्राची मोठी हानी - मुख्यमंत्री
मुंबई, दि.14 : हिंद केसरी हरिश्चंद्र बिराजदार यांच्या निधनाने भारतीय कुस्तीची फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री चव्हाण म्हणतात की, 1969 मध्ये हिंद केसरी मिळविलेल्या बिराजदार यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला नावलौकिक मिळवून दिला आहे. कुस्ती क्षेत्राची परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालून कुस्ती हा खेळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. शिवछत्रपती, रुस्तम ए हिंद, दादोजी कोंडदेव, ध्यानचंद असे अनेक पुरस्कार बिराजदार यांना मिळाले आहेत. कुस्तीगीरांचे प्रशिक्षक, भारताचे मल्ल आणि 1970 मध्ये ब्रिटीश कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक विजेते म्हणून कामगिरी बजावलेल्या बिराजदार यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या खेळाडूचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ कुस्तीगीराला गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
---0---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा