मंत्रिमंडळ निर्णय : एकूण-4
स्थानिक स्वराज्य संस्थांना
सिंचन पुन:स्थापनेचा खर्च माफ
ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, कटक मंडळे तसेच
नगरपंचायतींकरीता जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून पिण्याच्या प्रयोजनासाठी बिगर
सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावांना मान्यता देतांना सिंचन पुन:स्थापना खर्च घेण्यात
येऊ नये. मात्र महानगरपालिकांकडून सिंचन पुन:स्थापना खर्च घेण्यात यावा असे आज
झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले.
स्थानिक
स्वराज्य संस्थांना (महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, कटक मंडळे (Cantonment Board), नगर पंचायत) जलसंपदा
विभागाच्या प्रकल्पातून घरगुती (पिण्याचे पाणी) प्रयोजनासाठीच्या बिगर सिंचन पाणी
आरक्षणाच्या प्रस्तावास मान्यता देताना सिंचनात झालेल्या कपातीपोटी संबंधित
संस्थेकडून सिंचन पुनःस्थापनेचा खर्च वसुल करण्यात येतो. मात्र महानगरपालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्था या
आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांच्याकडून हा खर्च घेण्यात येऊ नये, असा निर्णय झाला.
----०----
पिण्याच्या
पाण्यासाठी 32 बिगरसिंचन
पाणी आरक्षण
राज्यातील 32 पाणी
आरक्षण प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. खालील बिगर सिंचन पाणी आरक्षणाबाबतच्या 32 घरगुती (पिण्याचे पाणी) पाणी आरक्षण प्रस्तावांना
मान्यता देण्यात आली आहे.
अ.क्र
|
पाणी आरक्षणाची
मागणी करणाऱ्या संस्थेचे नांव
|
पाणी मागणी (दलघमी)
|
पाणी वापराचा प्रकार(घरगुती)
|
जलाशयाचे नांव
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
1
|
मौजे कसबे डिग्रज ता.मिरज, जि.सांगली येथील नळपाणी पुरवठायोजना
|
०.२७७७
|
घरगुती
|
कृष्णानदी
|
2
|
मौजे शिरटे ता.वाळवा, जि.सांगली नळ पाणी पुरवठा योजना
|
0.09310
|
घरगुती
|
कृष्णानदी
|
3
|
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत संभाजीपूर नळ
पाणीपुरवठा योजना ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
|
0.2573
|
घरगुती
|
कृष्णानदी
|
4
|
रिठद ग्रामीण पाणी पुरवठा योजना ता.रिसोड,जि. वाशिम
|
0.22
|
घरगुती
|
अडोळ ल.पा.योजना,
|
5
|
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमपुरक पाणीपुरवठा योजना मौ.देवणी, ता.देवणी, जि.लातुर
|
1.811
|
घरगुती
|
देवर्जन मध्यम प्रकल्प
|
6
|
सेवली पाणी पुरवठा योजना, ता.जालना, जि.जालना
|
0.2470
|
घरगुती
|
पिपळवाडी सा.तलाव ,
|
7
|
निर्मलग्राम तंटामुक्त ग़्रूपग्रामपचायत पसुरे (टोंगेवाडी) ता.भोर, जि.पुणे
|
0.00473
|
घरगुती
|
भाटघर जलाशय( निरा डावा
कालवाप्रकल्प),
|
8
|
नळपाणी पुरवठा योजनाभूगांव ता. मुळशी जि. पुणे
|
0.2409
|
घरगुती
|
भूगांवल.पा.तलाव ,
|
9
|
राष्ट्रीय पेयजल योजनापळासखेडा, काकर, ता.जामनेर,जि.जळगाव
|
0.0292
|
घरगुती
|
कापूसवाडी (सूर) ल.पा.योजना
|
10
|
राजदेहरेपाणी पुरवठा योजना, ता. चाळीसगांव, जि. जळगाव
|
0.0419
|
घरगुती
|
राजदेहरेल.पा.प्रकल्प
ता.चाळीसगांव
|
11
|
राष्ट्रीय पेयजल योजनामोयखेडा दिगर पाणी पुरवठा योजना,ता.जामनेर जि.जळग़ाव
|
0.0529
|
घरगुती
|
कापूसवाडी (सूर) ल.पा.योजना
|
12
|
राष्ट्रीय पेयजल योजनासारगांवता.जामनेर,
जि.जळग़ाव
|
0.0253
|
घरगुती
|
कापूसवाडी (सूर) ल.पा.योजना
|
13
|
पाणी पुरवठा योजनाडांगर बु. ता. अमळनेरजि.जळगांव
|
0.034
|
घरगुती
|
पिंपळकोठा भोलाणे ल.पा. तलाव
|
14
|
पथ्रोटपाणी पुरवठा योजना ता.अचलपुर,जि.अमरावती
|
0.445
|
घरगुती
|
शहानूरप्रकल्प
|
अ.क्र
|
पाणीआरक्षणाची
मागणीकरणाऱ्या संस्थेचेनांव
|
पाणीमागणी(दलघमी)
|
पाणीवापराचाप्रकार(घरगुती)
|
जलाशयाचेनांव
|
1
|
2
|
3
|
4
|
5
|
15
|
मौजे फुरसुंगी, उरूळीदेवाची न.पा.पु.यो.ता.हवेली,जि.पुणे
|
24.0468
|
घरगुती
|
खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा
उ.का .सा.क्र.28/100
|
16
|
कुडूत्रि न.पा.पु.यो.ता.राधानगरी,जि. कोल्हापूर
|
0.0350
|
घरगुती
|
राधानगरी प्रकल्प/भोगवती नदी
|
17
|
मौजे विंग नविन नळपा.पु.यो. ता.कराड,जि.सातारा
|
0.1599
|
घरगुती
|
कोयना नदी ,
|
18
|
मौजे खोर नळ पाणीपुरवठा योजना ता. दौ़ड, जि. पुणे
|
|
घरगुती
|
वरवंड तलाव (नविन मुठा उजवा
कालव्याने भरणारा)
|
19
|
मौजे डोणगांव, ता.मेहकर, जि.बुलढाणा पाणी पुरवठा योजना
|
1.1165
|
घरगुती
|
नेतन्सा ल.पा. प्रकल्प,
|
20
|
नगर परिषद किल्लेधारुर ता.धारुर,जि.बीड
|
1.6900
|
घरगुती
|
कुंडलिका मध्यम प्रकल्प,
|
21
|
जव्हार नगर परिषदवाढीव पाणीपुरवठा योजना ता.जव्हार, जि.ठाणे
|
1.2800
|
घरगुती
|
डोमिहिरा ल.पा.योजना,
|
22
|
ग्राम पाणी पुरवठा योजना व स्वच्छतासमिती खंडाळा शिंदे
ता.मालेगाव, जि.वाशिम,
|
0.035
|
घरगुती
|
अडोळ ल.पा प्रकल्प,
|
23
|
साईएज्युकेशन सोसायटी (मुक बधीर शाळेसाठी) गिजवणे, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर
|
0.0312
|
घरगुती
|
शेंद्री ल.पा.तलाव
|
24
|
बिडकीनपाणी पुरवठा योजना ता.पैठण,जि.औरंगाबाद
|
0.96
|
घरगुती
|
जायकवाडी प्रकल्प जलाशयातून
|
25
|
जवाहरशैक्षणिक संस्था गोवर्धन ता.जि.नाशिक
|
0.11
|
घरगुती
|
गोदावरी नदी गंगापुर धरण
|
26
|
महाराजाशिवछत्रपती प्रतिष्ठान (ट्रस्ट) स.नं. 13, कात्रज देहुरोड रस्ता बाहयवळणमहामार्ग,ता.हवेली,जि.पुणे
|
0.0388
|
घरगुती
|
लपा.तलाव आंबेगाव मुठा नदी/वडगांव नाला
|
27
|
सुजलनिर्मल अभियान अंतर्गत अक्कलकोट शहरासाठी पाणी
पुरवठा योजना बावकरवाडीता.अक्कलकोट जि.सोलापूर
|
1.536
|
घरगुती
|
बोरी मध्यम प्रकल्प
|
28
|
श्री.संतमुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी, लि. घोडसगांव ता.मुक्ताईनगर,
जि.जळगावसंबंधित
कारखाना वसाहतीसाठी
|
0.044
|
घरगुती
|
हतनूरजलाशय
|
29
|
पारोळा
पाणी पुरवठा योजना (UIDSSMT) कार्यक्रम
ता.पारोळा, जि.जळगांव
|
|
घरगुती
|
बोरी मध्यम प्रकल्प
|
30
|
सणसवाडी
ता. शिरूर जि.पुणे येथील नळ पाणी पुरवठा योजना
|
0.3850
|
घरगुती
|
भिमा नदिवरील वढू को.प. बंधारा
|
31
|
राष्ट्रीय
ग्रामीण पेयजल कार्यक्रम नशिराबाद पाणी पुरवठा योजना ता./जि. जळगांव
|
0.8200
|
घरगुती
|
शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्प ता./जि. जळगांव
|
32
|
पूरक
शिरूर (ता) पाणी पुरवठा योजना ता. अहमदपूर, जि. लातूर
|
0.5130
|
घरगुती
|
तिरू मध्यम प्रकल्प
|
----०----
आरोग्य सेवेतील पदव्युत्तर
पदविका पदवीधारकांना अतिरिक्त वेतनवाढ
वैद्यकीय व आरोग्य
सेवेतील गट - अ मधील अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदविका आणि पदवी असल्यास अनुक्रमे अतिरिक्त
तीन आणि सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आला. गट-अ मधील रुपये 15,600-39,100
ग्रेड पे 6,600 आणि त्याहून अधिक वेतनश्रेणी असणाऱ्या विशेषज्ञ संवर्ग, जिल्हा
आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक
आणि संचालक आरोग्य सेवा या पदांवरील वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता अधिकाऱ्यांना
अनुक्रमे तीन व सहा अतिरिक्त वेतन वाढ देण्यात येईल. या वेतनश्रेणीत ज्या
अधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर 2011 आणि 11 नोव्हेंबर 2012 चा लाभ घेतला असेल त्यांना या
योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे एकूण 9 कोटी 78 लाख रुपये खर्च येईल.
-----०-----
नाफेडमार्फत
खरेदी केलेल्या मालाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी शासन हमी
नाफेडमार्फत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे म्हणून 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल. यासाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय आज
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
नाफेडमार्फत
2013-14 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेत 216 कोटींची खरेदी झालेली आहे. यामध्ये उडीद, भूईमूग, तूर, चणा असे धान्य
आहे. मात्र शेतकऱ्यांना पैसे विलंबाने
मिळत असल्याने त्यासाठी 50 कोटी रुपयांची शासन हमी सहा महिन्यांसाठी मिळावी अशी
विनंती पणन महासंघाने केली होती.
यापूर्वी
पणन महासंघास संरक्षित खतसाठ्यासाठी 200 कोटी रुपयांची शासन हमी देण्यात आलेली होती.
त्याच धरतीवर हा निर्णय घेण्यात आला.
-----०----