गुरुवार, ३१ जुलै, २०१४

माळीण गावातील मृतांची संख्या 30 वर ;
धोकादायक ठिकाणच्या घरांचे स्थलांतर करणे आवश्यक
                               - मुख्यमंत्र्यांची माहिती
          मुंबई दि. 31 : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगराची दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मदत व बचावकार्य पूर्ण गतीने सुरु असून आतापर्यंत 30 मृतदेह सापडले आहेत.  या गावातील 44 घरे बाधित झाली असून पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास संभाव्य जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी असलेल्या घरांचे स्थलांतर करून नागरिकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.
          श्री. चव्हाण यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली होती.  याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) चे 300 जवान आधुनिक यंत्रसामुग्रीसह काम करीत आहेत.  दुर्घटनास्थळी जाणारे रस्ते अरुंद असल्याने आणि सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने यंत्रसामुग्री नेण्यात अडचणी आल्या. त्यावर मात करून रुग्णवाहिका आणि जेसीबी यंत्रे नेऊन काम सुरु करण्यात आले.  तथापि या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.  या ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. सर्व ढिगारा उपसण्याचे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
          सह्याद्रीच्या पट्टयामध्ये अनेक ठिकाणी डोंगराच्या पायथ्याला गावे वसलेली आहेत.  वृक्षतोड, डोंगरमाथ्यावर होणारी बांधकामे आणि अन्य स्वरुपाच्या घडामोडींमुळे अधूनमधून दरडी कोसळण्याच्या लहान-मोठ्या घटना घडतात.  शेतीसाठी डोंगरमाथ्यावर सपाटीकरण केले जाते, याला पडकई असे म्हणतात.  माळीण येथील घटना अशा प्रकारच्या कृत्यांमुळे झाल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  याबाबतही शहानिशा होणे आवश्यक आहे.  आवश्यकता भासल्यास यासंदर्भातील धोरण तयार करावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.   

---०---
मंत्रिमंडळ निर्णय : एकूण-4  

स्थानिक स्वराज्य संस्थांना सिंचन पुन:स्थापनेचा खर्च माफ

ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, कटक मंडळे तसेच नगरपंचायतींकरीता जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून पिण्याच्या प्रयोजनासाठी बिगर सिंचन पाणी आरक्षण प्रस्तावांना मान्यता देतांना सिंचन पुन:स्थापना खर्च घेण्यात येऊ नये. मात्र महानगरपालिकांकडून सिंचन पुन:स्थापना खर्च घेण्यात यावा असे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना (महानगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, कटक मंडळे (Cantonment Board), नगर पंचायत) जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून घरगुती (पिण्याचे पाणी) प्रयोजनासाठीच्या बिगर सिंचन पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास मान्यता देताना सिंचनात झालेल्या कपातीपोटी संबंधित संस्थेकडून सिंचन पुनःस्थापनेचा खर्च वसुल करण्यात येतो. मात्र महानगरपालिका वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्था या आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांच्याकडून हा खर्च घेण्यात येऊ नये, असा निर्णय झाला.
--------
पिण्याच्या पाण्यासाठी 32 बिगरसिंचन पाणी आरक्षण
            राज्यातील 32 पाणी आरक्षण प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. खालील बिगर सिंचन पाणी आरक्षणाबाबतच्या 32 घरगुती (पिण्याचे पाणी) पाणी आरक्षण प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.
अ.क्र
पाणी आरक्षणाची
मागणी करणाऱ्या संस्थेचे नांव
पाणी मागणी (दलघमी)
पाणी वापराचा प्रकार(घरगुती)
जलाशयाचे नांव
1
2
3
4
5
1
मौजे कसबे डिग्रज ता.मिरज, जि.सांगली येथील नळपाणी पुरवठायोजना
०.२७७
घरगुती
कृष्णानदी
2
मौजे शिरटे ता.वाळवा, जि.सांगली नळ पाणी पुरवठा योजना
0.09310
घरगुती
कृष्णानदी
3
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत संभाजीपूर नळ पाणीपुरवठा योजना ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
0.2573
घरगुती
कृष्णानदी
4
रिठद ग्रामीण पाणी पुरवठा योजना ता.रिसोड,जि. वाशिम
0.22
घरगुती
अडोळ ल.पा.योजना,
5
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमपुरक पाणीपुरवठा योजना मौ.देवणीता.देवणी, जि.लातुर

1.811
घरगुती
देवर्जन मध्यम प्रकल्प
6
सेवली पाणी पुरवठा योजना, ता.जालना, जि.जालना
0.2470
घरगुती
पिपळवाडी सा.तलाव ,
7
निर्मलग्राम तंटामुक्त ग़्रूपग्रामपचायत पसुरे (टोंगेवाडी) ता.भोर, जि.पुणे
0.00473
घरगुती
भाटघर जलाशय( निरा डावा कालवाप्रकल्प),
8
नळपाणी पुरवठा योजनाभूगांव ता. मुळशी जि. पुणे
0.2409
घरगुती
भूगांवल.पा.तलाव ,
9
राष्ट्रीय पेयजल योजनापळासखेडा, काकर, ता.जामनेर,जि.जळगाव
0.0292
घरगुती
कापूसवाडी (सूर) ल.पा.योजना
10
राजदेहरेपाणी पुरवठा योजना, ता. चाळीसगांव, जि. जळगाव
0.0419
घरगुती
राजदेहरेल.पा.प्रकल्प ता.चाळीसगांव
11
राष्ट्रीय पेयजल योजनामोयखेडा दिगर पाणी पुरवठा योजना,ता.जामनेर जि.जळग़ाव
0.0529
घरगुती
कापूसवाडी (सूर) ल.पा.योजना
12
राष्ट्रीय पेयजल योजनासारगांवता.जामनेर,
जि.जळग़ाव
0.0253
घरगुती
कापूसवाडी (सूर) ल.पा.योजना
13
पाणी पुरवठा योजनाडांगर बु. ता. अमळनेरजि.जळगांव
0.034
घरगुती
पिंपळकोठा भोलाणे ल.पा. तलाव
14
पथ्रोटपाणी पुरवठा योजना ता.अचलपुर,जि.अमरावती
0.445
घरगुती
शहानूरप्रकल्प
अ.क्र
पाणीआरक्षणाची
मागणीकरणाऱ्या संस्थेचेनांव
पाणीमागणी(दलघमी)
पाणीवापराचाप्रकार(घरगुती)
जलाशयाचेनांव
1
2
3
4
5
15
मौजे फुरसुंगी, उरूळीदेवाची न.पा.पु.यो.ता.हवेली,जि.पुणे
24.0468
घरगुती
खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उ.का .सा.क्र.28/100
16
कुडूत्रि न.पा.पु.यो.ता.राधानगरी,जि. कोल्हापूर
0.0350
घरगुती
राधानगरी प्रकल्प/भोगवती नदी
17
मौजे विंग नविन नळपा.पु.यो. ता.कराड,जि.सातारा
0.1599
घरगुती
कोयना नदी ,
18
मौजे खोर नळ पाणीपुरवठा योजना ता. दौ़ड, जि. पुणे

घरगुती
वरवंड तलाव (नविन मुठा उजवा कालव्याने भरणारा)
19
मौजे डोणगांव, ता.मेहकर, जि.बुलढाणा पाणी पुरवठा योजना
1.1165
घरगुती
नेतन्सा ल.पा. प्रकल्प
20
नगर परिषद किल्लेधारुर ता.धारुर,जि.बीड
1.6900
घरगुती
कुंडलिका मध्यम प्रकल्प,
21
जव्हार नगर परिषदवाढीव पाणीपुरवठा योजना ता.जव्हार, जि.ठाणे
1.2800
घरगुती
डोमिहिरा ल.पा.योजना,
22
ग्राम पाणी पुरवठा योजना व स्वच्छतासमिती खंडाळा शिंदे ता.मालेगाव, जि.वाशिम,
0.035
घरगुती
अडोळ ल.पा प्रकल्प,
23
साईएज्युकेशन सोसायटी (मुक बधीर शाळेसाठी) गिजवणे, ता.गडहिंग्लजजि.कोल्हापूर
0.0312
घरगुती
शेंद्री ल.पा.तलाव
24
बिडकीनपाणी पुरवठा योजना ता.पैठण,जि.औरंगाबाद
0.96
घरगुती
जायकवाडी प्रकल्प जलाशयातून
25
जवाहरशैक्षणिक संस्था गोवर्धन ता.जि.नाशिक
0.11
घरगुती
गोदावरी नदी गंगापुर धरण
26
महाराजाशिवछत्रपती प्रतिष्ठान (ट्रस्ट) स.नं. 13, कात्रज देहुरोड रस्ता बाहयवळणमहामार्ग,ता.हवेली,जि.पुणे
0.0388
घरगुती
लपा.तलाव आंबेगाव मुठा नदी/वडगांव नाला
27
सुजलनिर्मल अभियान अंतर्गत अक्कलकोट शहरासाठी पाणी पुरवठा योजना बावकरवाडीता.अक्कलकोट जि.सोलापूर
1.536
घरगुती
बोरी मध्यम प्रकल्प
28
श्री.संतमुक्ताई शुगर ॲण्ड एनर्जी, लि. घोडसगांव ता.मुक्ताईनगर, जि.जळगावसंबंधित कारखाना वसाहतीसाठी
0.044
घरगुती
हतनूरजलाशय
29
पारोळा पाणी पुरवठा योजना (UIDSSMT) कार्यक्रम ता.पारोळा, जि.जळगांव


घरगुती
बोरी मध्यम प्रकल्प
30
सणसवाडी ता. शिरूर जि.पुणे येथील नळ पाणी पुरवठा योजना
0.3850
घरगुती
भिमा नदिवरील वढू को.प. बंधारा
31
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम नशिराबाद पाणी पुरवठा योजना ता./जि. जळगांव
0.8200
घरगुती
शेळगांव बॅरेज मध्यम प्रकल्प ता./जि. जळगांव
32
पूरक शिरूर (ता) पाणी पुरवठा योजना ता. अहमदपूर, जि. लातूर
0.5130
घरगुती
तिरू मध्यम प्रकल्प
----०----
आरोग्य सेवेतील पदव्युत्तर पदविका पदवीधारकांना अतिरिक्त वेतनवाढ
वैद्यकीय व आरोग्य सेवेतील गट - अ मधील अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदविका आणि पदवी असल्यास अनुक्रमे अतिरिक्त तीन आणि सहा प्रोत्साहनात्मक वेतनवाढी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.     गट-अ मधील रुपये 15,600-39,100 ग्रेड पे 6,600 आणि त्याहून अधिक वेतनश्रेणी असणाऱ्या विशेषज्ञ संवर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, तसेच उपसंचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक आणि संचालक आरोग्य सेवा या पदांवरील वरीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता अधिकाऱ्यांना अनुक्रमे तीन व सहा अतिरिक्त वेतन वाढ देण्यात येईल. या वेतनश्रेणीत ज्या अधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर 2011 आणि 11 नोव्हेंबर 2012 चा लाभ घेतला असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे एकूण 9 कोटी 78 लाख रुपये खर्च येईल.
-----०-----

नाफेडमार्फत खरेदी केलेल्या मालाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी शासन हमी
        नाफेडमार्फत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे म्हणून 50 कोटी रुपये निधी देण्यात येईल.  यासाठी शासनाने हमी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
            नाफेडमार्फत 2013-14 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेत 216 कोटींची खरेदी झालेली आहे.  यामध्ये उडीद, भूईमूग, तूर, चणा असे धान्य आहे.  मात्र शेतकऱ्यांना पैसे विलंबाने मिळत असल्याने त्यासाठी 50 कोटी रुपयांची शासन हमी सहा महिन्यांसाठी मिळावी अशी विनंती पणन महासंघाने केली होती.
            यापूर्वी पणन महासंघास संरक्षित खतसाठ्यासाठी 200 कोटी रुपयांची शासन हमी देण्यात आलेली होती. त्याच धरतीवर हा निर्णय घेण्यात आला.

-----०----